आता केसरकरांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही

नारायण राणेंचा प्रचार करणार या वक्तव्यावर चंद्रकांत कासार यांनी घेतला समाचार;जवळच्या कार्यकर्त्यांना संपविल्याचाही केला केसरकरांवर आरोप

⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल लोकसभा निवडणुकीला राणेंचा प्रचार करणार असल्याचे वक्तव्य केले असले तरी सिंधुदुर्गची जनता मात्र त्यांच्या वक्तव्याला बळी पडणार नसल्याची टिका उद्धव बाळासाहेब गटाचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आज येथे केली. दरम्यान दीपक केसरकर यांनी आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी देखील लक्षात घ्यावे, आपण कोणाबरोबर वाहत चाललो आहोत, असाही सल्ला कासार यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिला आहे.

यावेळी कासार बोलताना पुढे म्हणाले की दीपक केसरकर यांनी हजारो कार्यकर्त्यांना मोडीत काढले. आज पर्यंत आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना ते कामापुरता वापर करून नंतर ते बाजूला करतात, अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता त्यांना ओळखले पाहिजे, असेही कासार यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच सावंतवाडी मतदारसंघाचा विकासामागे मागे पडण्याच्या कारणीभूत हे फक्त केसरकर असल्याचा देखील त्यांनी आरोप यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page