मंत्री केसरकर यांचे कालचे वक्तव्य राणेंची लाचारी दाखविणारे

ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची खडतर टीका

⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर काल सावंतवाडीत येऊन विकासावर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते जिल्ह्यात येऊन राणेंचा प्रचार करण्याचे जाहीर करून एका प्रकारे राणेंचे पाय धरून लाचारी काय असते ? हे कालच्या वक्तव्यावरून दिसून आल्याची टिका उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केसरकर यांच्यावर केला आहे.

दरम्यान, ते जरी आमच्या सोबत नसले तरी आम्ही त्यांच्याकडून विकास काम करून घेणार असल्याचे ही राऊळ म्हणाले. ते येथील सावंतवाडीत शिवसेने शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राऊळ पुढे म्हणाले मतांच्या गणितासाठी राणेंची लाचारी करा, अन्यथा अन्य कोणाची, आम्हाला काही फरक पडत नाही. येणार्‍या निवडणूकीत शिवसेना नक्कीच केसरकरांना धुळ चारेल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.

यावेळी उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, रशिला माळदेव, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page