⚡सावंतवाडी ता.१७-: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 सातोळी बावळट येथे राबविण्यात आला. यावेळी जिल्हा वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शना खाली हा सप्ताह पार पडला.
यात जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग ए. यस .आय , अजित घाडी. पो . हे .कॉ .प्रवीण सापळे , विलास नर , अमिता दळवी सहभागी झाले होते.
दरम्यान चालकांना रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शिका पुस्तके व माहीती पत्रके वाटप करत उपघात होऊ नये म्हणुन चुकीच ओव्हरटेकींग करू नका अतिवेगात वाहन चालवु नका . दारू पिऊन वाहन चालवु नका . वारंवार सिग्नल तोडु नका . वाहन आक्रमकपणे चालऊ नका अशा सुचना दिल्या.
