शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख बबन राणे : गाळ काढताना दुर्लक्ष केल्याचा आरोप
सावंतवाडी ता.१४-: मोती तलाव येथील कोसळलेला कठड्याला सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी केला आहे. ज्यावेळी गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नसून त्या चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याने तो कठडा कोसळला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
श्री राणी पुढे म्हणाले चुकीच्या पद्धतीने गाळ उपास झाल्यामुळे ‘तो’ कठडा कोसळला संबंधित गाळ उपास मोहिमे दरम्यान यंत्रणेला योग्य त्या सूचना मुख्याधिकाऱ्यानी देणे आवश्यक होते ती त्यांची जबाबदारी होती ,मात्र तसेच झाले नाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे यंत्रणे चुकीच्या पद्धतीने गाळ काढला हा गाळ काढत असताना कठड्यावर मोठे मोठे आघात झाल्यामुळे त्याचवेळी तो खचला होता तर पावसाळ्यात तो पूर्णतः कोसळला या प्रकाराला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार आहेत त्यांनी वेळेत लक्ष घातले असते तर ही परिस्थिती उद्रवली नसती.
जरी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी एक कोटी प्राप्त झाली असले तरी तो निधी शासनाने मुख्याधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करून घ्यावा अशी मागणी आपण करणार आहे त्यासाठी आपण जनहित याचिका देखील दाखल करणार आहे.असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
