भाजपकडून पाळला जात नाही युती धर्म…

अनारोजीन लोबो;

⚡सावंतवाडी ता.१४-: राज्यात भाजप व शिंदे गटाच्या सरकारात युतीच धर्म पाळा असे आदेश असताना स्थानिक भाजप मात्र युतीच धर्म पाळत नसल्याचा आरोप जेष्ठ माजी नगरसेविका आनोरोजीन लोबो यांनी आज येथे केला आहे. दरसाल झालेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत देखील हा युतीचा धर्म पाळला नसल्याचे त्या म्हणाल्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत लोबो बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या काल झालेला खरेदी विक्री संघाच्याच निवडणूकीत स्थानिक भाजप युतीचा धर्म पाळला नाही दरम्यान या पुढे जर असच राहिले तर आम्हाला वेगळ विचार करावा लागेल तसेच आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page