न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन

⚡कणकवली ता.१४-: न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कालेज फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भूमिपूजन प्रसिद्ध उद्योजिका दानशूर व्यक्तिमत्व सौ मानसी माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार आनंद मरये ,फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे,फोंडाघाट एज्यु सोसायटी संचालक संजय आग्रे, संदेश पटेल,रंजन नेरुरकर , बबन पवार , राजू पटेल‌ ,सचिन तायशेटे, मनीष गांधी, माजी चेअरमन बाळासाहेब डोर्ले, आबू पटेल‌‌ सिने दिग्दर्शक विजू पटेल, सुभाष मर्यें, भाई पटेल , सुहास लाड ,संजय सावंत यासह प्रशालेचे माजी विद्यार्थी फोंडाघाटचे ग्रामस्थ‌ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी बोलताना सौ. माजगांवकर म्हणाल्या ,शाळा ही विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे यासाठी शिक्षकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन योगदान देणे गरजेचे आहे .आणि ते आमचे शिक्षक करत आहेत म्हणूनच एवढा बदल आपल्याला पहायला मिळतो.

माझ्याकडून जे जे सहकार्य करायचे आहे ते मी करेन याहीपूर्वी माजगांवकर मॅडमनी प्रशालेच्या इमारतीलाआर्थिक मदत केली असून त्याचबरोबर सहा वर्ग खोल्या डिजिटल करून देखील दिल्या आहेत संस्था पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतातून माझगांवकर कुटुंबी यांचे आभार व्यक्त केले.कारण आताच्या काळात शैक्षणिक संस्थेसाठी आर्थिक मदत करणारे माजगांवकर कुटुंबीय आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत.कार्यक्रम प्रसंगी अनेक माजीविद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी भावना व्यक्त केल्या

You cannot copy content of this page