शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळातर्फे
फोंडाघाट येथे खुल्या कबड्डी स्पर्धा

⚡कणकवली ता.१४-: शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, फोंडाघाट यांच्यावतीने १५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता 70 किलो वजनी गटाच्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा,खैराट, माळवाडी येथे आयोजित केल्या आहेत.विजेत्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकासह रोख पारितोषिक रु.10023/- ने सन्मानित करण्यात येईल तर उपविजेत्या संघास रु 5023 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच तृतीय आणी चतुर्थ क्रमांक च्या संघास अनुक्रमे रु 2023 चे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे शिवाय उत्कृष्ठ पकड,उत्कृष्ठ चढाई आणी अष्टपैलू खेळाडू सही पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. सलग तिसऱ्या वर्षी होणाऱ्या या कबड्डी स्पर्धाचा संघानी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नितेश लाड (८३८०९९६७४०) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page