सावंतवाडी पोलीस व आरटीओचा संयुक्त उपक्रम
⚡सावंतवाडी ता.१४-: येथील भोसले उद्यानात सोमवारी १६ रोजी सकाळी १० वा. आरटीओ व सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत वाहतूकी संदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले. यावेळी वाहतूक नियमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
