सावंतवाडी पोलिसांकडून रस्ता वाहतूक नियमांबाबत शहरात जनजागृती …

सावंतवाडी ता.१४-:सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत शहरात सडक सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत वाहतूक संदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात शहरातील रिक्षा व्यवसायिक, सिक्स सीटर व टेम्पो व्यवसायिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी वाहनधारकांना रस्ता वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक तसेच वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page