महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कणकवली अध्यक्षपदी उमेश परब

सचिव रोहन पारकर, उपाध्यक्ष मयूर ठाकूर

⚡सिंधुदुर्ग दि.१४-: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्ष”पदी” झी 24 तासचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी उमेश परब यांची नियुक्ती तर सचिव”पदी” पत्रकार रोहन पारकर व उपाध्यक्ष”पदी”पत्रकार मयुर ठाकूर तर खजिनदार”पदी”जेष्ठ पत्रकार आनंद तांबे तर सदस्य म्हणून पत्रकार विराज गोसावी,यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सर्वाचे पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी उपाध्यक्ष समिल जळवी,सचिव शिरीष नाईक,खजिनदार सौ.संजना हळदिवे,सहखजिनदार संजय भाईप,सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर यांनीही नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कणकवली:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील आज कणकवली पंचायत समिती येथील पत्रकार कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग उपाध्यक्ष समिल जळवी,सचिव शिरीष नाईक,खजिनदार सौ.संजना हळदिवे,सहखजिनदार संजय भाईप,सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर आदि सदस्य तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्ष”पदी” झी 24 तासचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी उमेश परब यांची नियुक्ती केली.तर सचिव”पदी” पत्रकार रोहन पारकर यांची नियुक्ती केली.तर उपाध्यक्ष”पदी”पत्रकार मयुर ठाकूर यांची यावेळी नियुक्ती केली.तर खजिनदार”पदी” जेष्ठ पत्रकार आनंद तांबे यांची निवड करण्यात आली तर सदस्य”पदी” म्हणून विराज गोसावी यांचीही यावेळी नियुक्ती केली.

You cannot copy content of this page