एॅड. डॉ जितेंद्र आंबेरकर
देवगड
दहावी, बारावी, पदवी पदविका उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये निश्चित स्पर्धा परीक्षा ंसाठी आवड निर्माण होईल असा आशावाद तिर्लोट आंबेरी,माजी विद्यार्थी संघ मुंबई या नोंदणीकृत संस्थेच्या १९ व्या संमेलनाचे स्नेहसंमेलना अध्यक्ष ऍड डॉ .जितेंद्र प्रभाकर आंबेरकर यांनी व्यक्त केला.
ठाणे येथील शुभारंभ बॅकक्वेट्स सभागृहात पार पडलेल्या तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाच्या १९ व्या स्नेहसंमेलनात स्नेहसंमेलना अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी स्नेहसंमेलनाचे उदघाटक ऍड विकास जोशी ,स्वागत अध्यक्ष दीपक भाबल, किसन जुवाटकर, सरचिटणीस श्रीराम कडू ,खजिनदार बाळ जुवाटकर ,देवेंद्रनाथ प्रभू, सल्लागार प्राचार्य डॉ गोपीनाथ सारंग,आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ऍड. जितेंद्र आंबेरकर म्हणाले की तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघटना ही आज सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. ही वाटचाल करताना संघटनेने काय कमावले आणि काय गमावले याचा वापर करायची ही वेळ नाही मात्र आत्ताची तरुण मंडळी ही मोठ्या हिमतीने संघटना चालवीत आहेत त्यांच्यातील ही तळमळ पाहून सर्वांनाच खरेच या संघटनेचा अभिमान वाटावयास हवा .संघटनेतील तरुण पदाधिकारी संस्थेचा हा डोलारा चालविताना जुन्या जाणता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शक या नात्याने सर्वांना सहकार्य करणे हे गरजेचे आहे आणि ज्यावेळी हा दिवस उजाडेल तो सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असे सांगून ते पुढे म्हणाले, संघटनेने गुणवंतांचा सत्कार करून त्यांच्या स्पर्धात्मक ओढ निर्माण करून उर्मी निर्माण केली आहे. त्यामुळे आपल्या वाढीतील तरुण डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक झाले आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. मात्र उद्या यातील काही दिवस स्पर्धा परीक्षांकडे वळून सनदी अधिकारी होतील असावा असा आशावाद सुद्धा व्यक्त केला. गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात एमबीबीएस झालेली डॉ. जुई प्रल्हाद भाबल, तसेच बी एच एम एस झालेला डॉ.सुक्षेम गोपीनाथ सारंग यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ही सुद्धा तमाम आंबेरी वासियांना अभिमानाची बाब ठरली आहे सन २०२०- २१-२२ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करून त्यांना पुढील निरोगी व दीर्घायुष्य साठी शुभेच्छा देण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेसाठी लागणारे ऍड महेश दाजी भाबत यांनी पुरविले.वार्षिक आढावा दीपक भाबल यांनी घेतला ऍड विकास जोशी,सल्लागार प्राचार्य डॉ गोपीनाथ सारंग,यांनी मनोगत व्यक्त केले.
