ट्विंकल स्टार प्ले स्कुलच्या बाल चिमुकल्यानी स्नेहसंमेलन गाजवले

वेशभूषा,ग्रुप डान्स ,वैयक्तिक नृत्य सादर करत दिला सामाजिक संदेश

⚡कणकवली ता.०९-: कणकवली शिवाजीनगर येथील गोकुळ प्रकल्प प्रतिष्टान संचलित ट्विंकल स्टार प्ले स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलनात ग्रुप डान्समध्ये तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना, पाऊले चालती पंढरीची वाट अशी बालकलाकारांनी नृत्य सादर करीत वारकरी सांप्रदायचे दर्शन घडविले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत महापुरुषांची वेशभूषा करीत त्यांचे सामाजिक दायित्व पुढे नेण्याचा संदेश दिला. सोलो ड्रान्स स्पर्धेतून विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यामुळे हा कार्यक्रम आगळा वेगळा व यादगार ठरला.


शिवाजीनगर येथील गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान संचलित ट्विकिंल स्टार प्ले स्कूलचे
स्नेहसंमेलनानिमित्त फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, ग्रुप डान्स स्पर्धा घेण्यात आली. यात फॅन्सी ड्रेसमध्ये स्वयंम यादव, सोलो डान्समध्ये अर्थव तेली, ग्रुप डान्समध्ये पाऊले
चालती ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धांचा सविस्तर निकालपुढीलप्रमाणे,
फॅन्सी ड्रेस स्पर्धा – द्वितीय तेजश्री लाटे, तृतीय सुप्रिया पटेल, सोलो डान्स स्पर्धा – द्वितीय आराध्या शिंदे, तृतीय निशांक शिंगाडे,
ग्रुप डान्स स्पर्धा – द्वितीय पाऊले चालती ग्रुप, तृतीय- तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालेना ग्रुप,फॅन्सी ड्रेस स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी, सोलो डान्स स्पर्धेत ९ विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स स्पर्धेत दोन ग्रुपने सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे परीक्षण सुदिन तांबे व
पूनम तांबे यांनी केले.
टविंकल प्ले स्कूलचे स्नेहसंमेलन येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित केले होते. याचे उद्घाटन हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद उर्फ बंड्या ठाकूर यांच्या
हस्ते झाले. यावेळी ठाकरे गट (शिवसेनेचे) शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक उमेश वाळके, कन्झ्युमर सोसायटीचे संचालक संदीप नलावडे, टविंकल स्टार प्ले स्कूलच्या संचालिका सुनीता कदम, ज्येष्ठ वारकरी विलास बिडये, सविता अंधारी, बळी राणे, शिक्षिका अंजली आजगावकर, प्रणव कामत, प्रितेश कामत, सोहम वाळके आदी उपस्थित होते.
यावेळी वारकरी विलास बिडये, सविता अंधारी, बळी राणे यांचा स्कूलतर्फे सत्कार करण्यात आला. स्कूलचा आदर्श विद्यार्थी म्हणून अर्थव गंगावणे याला सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता कदम, सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार अंजली आजगावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page