रोणापाल माऊली मंदिरात दशावतार नाट्यमहोत्सवासह लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम संपन्न

⚡बांदा ता.०९-: रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ व श्री देवी माऊली देवस्थान समिती आयोजित मंदिरात ४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय दशावतारी नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने मंदिरात आयोजित लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम सोहळ्याला पंचक्रोशीसह चाकरमानीही मोठ्या संख्यने उपस्थित होते.

        नाट्यमहोत्सवात जय हनुमान दशावतार मंडळ, आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ व मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाट्यप्रयोग झाले. रविवारी लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम व शुध्दीकरण कार्यक्रम, महाआरती, महाप्रसाद, संचारित देवतांचा आशिर्वाद व सवाद्य देवता भ्रमण हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्री देवी माऊली उत्सव मंडळातर्फे सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page