शेतकरी चिंतातुर ; चवळी, हळसाणा, मिरची, कुळीथ पिक धोक्यात
⚡बांदा ता.०९-: मडुरा पंचक्रोशीतील बहुतांश ठिकाणी रब्बी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर बनला आहे. मोठ्या कष्टातून उभे केलेल्या चवळी, मिरची, कुळीथ, वाल, हळसाणा पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे
. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पिके वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रशासनाने बाधित पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी पिक उत्पादकांमधून होत आहे.
