आम.नितेश राणे:5 वर्षांत विकासकामांनी कणकवलीचा चेहरामोहरा बदलला
⚡कणकवली ता.०९-: कणकवलीच्या जनतेने पाच वर्षांपूर्वी आमच्यावर विश्वास दाखवून कणकवली सत्ता आमच्या हाती दिली ही सत्ता आल्यानंतर जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले.आपल्याला पुढच्या वर्षीही कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे. तर पुढच्या वर्षीही वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द आमदार नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला.
कणकवली पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर , अबिद नाईक,विराज भोसले, अभिजीत मुसळे, शिशिर परूळेकर, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आम.नितेश राणे म्हणाले, राजकीय भाषण देऊन तुमच्यामध्ये आणि या कलाकारांमध्ये जास्त वेळ आम्हाला घ्यायचा नाही. पण कणकवली महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जे काही आपल्यासाठी करू शकलो, जो काही भव्य दिव्य कार्यक्रम आपल्यासाठी आणू शकलो, हे फक्त आमच्या कणकवलीकरांमुळेच आहे. कारण तुम्ही आम्हाला पाच वर्ष अगोदर आशीर्वाद देऊन कणकवलीची धुरा आमच्या हातात दिलात.ते जर केला नसता तर तुम्हाला आम्ही आजचा क्षण देऊ शकलो नसतो. निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळा इतिहास घडवला. आपल्यासमोर मतदानाच्या निमित्ताने निवडणूकीत कणकवलीकरांनी दाखवून दिली. ते म्हणाले, कणकवलीकरांनी जो विश्वास आमच्यावर टाकला, त्या विश्वासासाठी आम्ही सगळेजण दिवस रात्र मेहनत करू. आज आपल्यासमोर शिंदे फडणवीस सरकारकडून तब्बल २२ कोटी आमच्या कणकवलीकरांसाठी विकास निधी आणून दाखवलेला. नगराध्यक्ष आणि पूर्ण टीम गप्प बसली नाही तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असो अथवा भविष्यात होणारा बार माही धबधबा याबरोबरच अनेक विकास कामे सातत्याने मार्गी लावली जात आहेत शैक्षणिक क्षेत्रातील कणकवली कमी नाही हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.सातत्याने आपली सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जे शब्द आपल्याला दिले ते सगळे शब्द आम्ही पाच वर्षांमध्ये पूर्ण करून दाखवले. हा उत्साह असाच दरवर्षी आपल्याला आम्ही देऊ. आपल्या सेवेत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आलेल्या सगळ्या कलाकारांना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी आम्हाला हा महोत्सव घेण्यासाठी मदत केली आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आम. नितेश राणे यांनी आभार मानले. परत आपल्याला पुढच्या वर्षी कणकवली महोत्सव बघायचा असेल तर पून्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती सत्ता आली पाहिजे तर पुढच्या वर्षीही वेगळ्या पद्धतीचा महोत्सव याठिकाणी साजरा करू. असा शब्द देखील आमदार नितेश राणेंनी कणकवलीकरांना दिला.
यावेळी बोलताना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, कणकवली वासीयांनी दाखविलेला विश्वास गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री ना.राणे यांच्या आशीर्वादाने आणि आम.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ करून दाखविला आहे. विकासाचे अनेक प्रश्न सुटू शकले याचे कारण आपला आमच्यावर असलेला विश्वास. या पुढच्या काळातही हा विश्वास कायम ठेवा असे सांगताना या महोत्सवासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानतो असे सहकार्य नेहमी ठेवा. कणकवलीत विकासाची गंगा आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत व राजेश कदम यांचा सन्मान करण्यात आला.
