⚡मालवण ता.०९-: कला दर्पण कला प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा रांगोळी कला क्षेत्रातील मानाचा “श्रीरंग कलागौरव” पुरस्कार कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक श्री. समीर अशोक चांदरकर यांना जाहीर झाला आहे. रांगोळी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असलेल्या व्यक्तीमत्वास हा पुरस्कार दिला जातो.
समीर चांदरकर हे उत्तम रांगोळीकार असून अनेक रांगोळी स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळविले आहे. त्यांच्या विविध विषयांवरील रांगोळ्या नेहमीच लक्षवेधी ठरल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बालगंधर्व कला दालन पुणे येथे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते श्री तिरुपती बालाजी चरित्र रंगावली प्रदर्शनात २६ जानेवारीला समीर चांदरकर यांना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. श्रीरंग कला गौरव सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्द श्री. चांदरकर यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
