विद्यार्थ्यांनी विकिरणाचा सखोल अभ्यास करावा

जेष्ठ शास्त्रज्ञ सुरेश सनये यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी
अणूपासून निर्माण होणाऱ्या विकिरणाचे आपल्या जीवनात अनेक फायदे असून मेडिकल सायन्स मध्ये तर विकिरणाला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी विकिरणाचा सखोल अभ्यास केल्यास आपले भावी आयुष्य उज्वल बनेल असे प्रतिपादन मुंबई येथील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे सेवानिवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुरेश सनये यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. सुरेश सनये यांनी हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान भंडारी ए. सो. हायस्कूल आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सनये यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
रोटरी क्लब ऑफ मालवण माजी अध्यक्ष श्री उमेश सांगोडकर, दिलीप मांजरेकर, अभय कवटकर ,श्रीकांत वेंगुर्लेकर , रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष श्री रतन पांगे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वामन खोत ,पर्यवेक्षक एच बी तिवले,श्री तांबे श्री प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक वामन खोत यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले

यावेळी डॉ. सुरेश सनये यांनी अणू शक्ती अणू उर्जा म्हणजे काय? या अणूऊ उर्जेचा उपयोग मानवी जीवनामध्ये किती उपयुक्त आहे याचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेत समजावून सांगीतले त्याचप्रमाणे असे अणुऊर्जा प्रकल्प भारतात कुठे कुठे आहेत. त्यांचे कार्य कसे चालते याविषयी प्रोजेक्टरच्या सहाय्याने समजावून सांगीतले त्याचप्रमाणे ही अणु उर्जा मानवाला शाप नसून शेती, , औघोगिक , इ विविध क्षेत्रामध्ये कशी वरदान ठरलेली आहे आणि अणुऊर्जे संबंधिचे लोकाच्या मनामध्ये गैरसमज कसे निर्माण होतात या संबधी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला यावेळी श्री सनये यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस धडपडत असणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर, कॉऊन्सील ऑफ मॅनेजमेंट ऑनररी जन सेक्रेटरी श्री साबाजी करलकर तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर हेरेकर तसेच इतर सर्व संस्था पदाधिकारी याना धन्यवाद दिले शेवटी प्रफुल्ल देसाई यांनी आभार मानले

You cannot copy content of this page