⚡मालवण ता.२५-: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मालवण पं. स. चे माजी सभापती बापूभाई शिरोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंगणवाडीतील मुलांच्या बडबडगीत व गोष्ट सांगणे या स्पर्धा झाल्या.
यावेळी प्रारंभी बालकांच्या हस्तेच या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दीपक भोगटे यानी बापूभाईंच्या निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचा पालकांना परिचय करून दिला व बापूभाईना लहान मुले अतिशय आवडत असल्याने हा अंगणवाडीच्या मुलांचा मेळावा आयोजित केला आहे असे सांगितले. कट्टा, कुसरवे, गोळवण, वाईरकरवाडी, नांदोस, काराणेवाडी, गुरामवाडी, डॉन बॉस्को आदी अंगणवाडीतील ४५ मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती. या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, काळसेकर, सुजाता पावसकर आदी उपस्थित होते.
