⚡मालवण ता.२५-: ‘एक गाव एक गणपती’ अशी अनोखी संकल्पना राबविणाऱ्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध अशा कोईल येथील श्री गणपती देवस्थान जीर्णोद्धार सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिन दि. २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
२७ डिसेंबर रोजी नेत्र, आरोग्य तपासणी शिबीर सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत होईल. २८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ ते १ महाआरती, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५.३० सत्यनारायण पूजा, ६ ते ७ आरती, ७ ते रात्री ८ दीपोत्सव, ९ ते १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ११ वाजता श्री सिद्धिविनायक नाट्य मंडळ, मुंबईचे दशावतारी नाटक (हार्मोनियम-मयुर गवळी) होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
