रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत निधी दिपक पेडणेकर हिला सुवर्णपदक

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;निधी पेडणेकर मसुरे अंगणवाडीची बाल विद्यार्थिनी* ..

⚡मालवण ता.२५-: रंगोत्सव सेलिब्रेशन ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कला स्पर्धा मुलुंड मुंबईच्या रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अंगणवाडी मसुरे गडघेरा ची विद्यार्थिनी निधी दीपक पेडणेकर हिने रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिची पुढील राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली.
निधी पेडणेकर हिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

निधी हिला विनोद कदम, अंगणवाडी शिक्षिका श्रीम. नंदा सावंत मॅडम, अंगणवाडी सहाय्यक बागवे मॅडम,केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर , श्रीयुत गावडे , उमेश खराबी , विनोद सातार्डेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

फोटो कॅप्शन..

मसुरे येथे कु.निधी पेडणेकर हिला सुवर्णपदक प्रदान करताना गुरुनाथ ताम्हणकर उमेश खराबी श्रीमती मगर…..
छाया

You cannot copy content of this page