सरपंच पदाच्या ११८ तर ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण पुरुष २५,१६०,स्त्री २३,२१९ एकूण ४८,३७९ एवढे मतदान झाल्याने ५८.२१ टक्के मतदान झाले होते.तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के पेक्षा मतदान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ४८ सरपंच अडसाठी ११८ तर ५२ ग्रामपंचायतीच्या ३५२ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
कलमठ गावडेवाडी व फोंडाघाट गांगोवाडी येथे संध्याकाळी ५.३० वाजल्यापूर्वी मतदार मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.त्यामुळे चिठ्या देवून त्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील कलमठ ग्रामपंचायत येथे शिवसेना आमदार वैभव नाईक ,युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी बुथवर भेट देऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या बुथवर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.तसेच माजी खा.निलेश राणे यांनी वरवडे फणसनगर येथे मतदानाचा हक्क बजावत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
दरम्यान सकाळी नाटळ येथील प्रभाग क्र. १ येथे मतदानास सुरुवात होण्यापूर्वीच इव्हीएम मशिन बंद पडल्याने बदलण्यात आले. खारेपाटण – कांजिर्डे येथे मतदान सुरु झाल्यानंतर साधारण दोन तासानंतर मशिनमध्ये बिघाड झाला. तेथेही मशिन बदलण्यात आले.अन्य काही गावांमध्ये किरकोळ अडचणी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
कणकवली तालुक्यातील
बोर्डवे ५९.९३ टक्के, कसवण- तळवडे ७५.७६ टक्के,फोंडाघाट ४२.०८ टक्के, वरवडे ६४.८६ टक्के ,पियाळी ६२.२२ टक्के ,
साळीस्ते ५९.३२ टक्के,वाघेरी ७३.९७ टक्के ,तिवरे ६५.३९ टक्के ,तरंदळे ५६.२८ टक्के ,
सावडाव ६४टक्के,सातरल ७४.७० टक्के,बिडवाडी ६३.१६ टक्के ,कासरल ८४.७१ टक्के ,
शेर्पे ४९.८६ टक्के,साकेडी ५१.८७ टक्के,हरकुळ बुद्रुक ५४.३५ टक्के ,कळसुली ५६.९५ टक्के,दारिस्ते ६०.७३ टक्के ,शिवडाव ६१.१५ टक्के,नडगिवे ४९.८३ टक्के ,ओसरगाव ६४.३६ टक्के ,सांगवे ५४.५९ टक्के,तळेरे ५१.०२ टक्के, माईण ५६.८१ टक्के,कुंभवडे ६७.१४ टक्के ,करंजे ५६.९१ टक्के, वागदे ६५.३० टक्के ,कलमठ ५२.५५ टक्के,नागवे ५२.६५ टक्के , कासार्डे ५३.१८ टक्के,हरकुळ खुर्द ५६.६० टक्के, नाटळ ५३.४४ टक्के,घोणसरी ६१.४८ टक्के, लोरे ६२.४९ टक्के, नांदगांव ६६.४८ टक्के, कुरंगवणे ५५.२० टक्के,चिंचवली ७४.९४ टक्के, हळवल ६८.२५ टक्के, खारेपाटण ५४.९८ टक्के,शिरवल ६४.१५ टक्के, डामरे ६६.१४ टक्के, दारुम ७६.३२ टक्के , आशिये ७०.३४ टक्के ,करूळ ६६.६७ टक्के, कोंडये ७२.२७ टक्के, असलदे ६८.९० टक्के, दिगवळे ५८.४५ टक्के,आयनल ६२.२८ टक्के,नरडवे ५३.३० टक्के ,कोळोशी ५८.५२ टक्के,जानवली ६४.५९ टक्के या गावांमध्ये मतदान दुपारी ३.३० वाजेपर्यंत झाले होते.मात्र ,रात्री उशिरापर्यंत सर्व मतदानाची आकडेवारी उपलब्ध नव्हती.
ओसरगाव ग्रामपंचायत निवणुक मतदानासाठी गावातील १०० वर्षे झालेल्या द्रोपदी राणे व पार्वती नाईक – पाडावे या ज्येष्ठ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत कलमठ व तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.
तहसिलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नायब तहसिलदार शिवाजी राठोड, मंडळ अधिकारी शंकर पाटील,दिलीप पाटील, तलाठी, इतर कर्मचारी, झोनल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्राध्यक्ष, पोलीस आदी सर्व कर्मचारी मतदान प्रक्रियेत काम केले.तर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
