सर्वाधिक मतदान नेर्ले येथे ७४.८६ टक्के
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण ६६.२२ टक्के मतदान झाले आहे. एकूण ११ हजार ३७ मतदारांपैकी ७ हजार ३०९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ११ सरपंच पदासाठी ३८ उमेदवार व ४८ सदस्यांसाठी ९६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. सगळ्यात कमी मतदान कुर्ली येथे ५७.८९ टक्के तर सर्वात जास्त मतदान नेर्ले येथे ७४.८६ टक्के झाले आहे.
ग्रामपंचायत निहाय एकूण मतदान व झालेले मतदान आणि टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
नानिवडे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण ७५४ मतदारांपैकी ४७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण ६२.८६ टक्के मतदान झाले आहे.
तिरवडे तर्फ खारेपाटण एकूण ६४९ मतदारांपैकी ४६८ मतदारांनी मतदान केले. तर एकूण मतदान ७२.११ टक्के मतदान झाले आहे.
कोळपे एकूण १ हजार १८४ मतदारापैकी ८७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७३.५६ टक्के मतदान झाले आहे.
सडुरे शिराळे एकूण ८५१ मतदारांपैकी ५६९ मतदारांनी मतदान केले. तर एकूण ६६.८६ टक्के मतदान झाले आहे.
उंबर्डे एकूण २ हजार ५९ मतदारांपैकी १.हजार ३८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर एकूण ६७.७१ टक्के मतदान झाले आहे.
नेर्ले एकूण ५२९ मतदारांपैकी ३९६ मतदारांनी मतदान केले. तर ७४.८६ टक्के मतदान झाले आहे.
नापणे एकूण ६४१ मतदारांपैकी ४२२ मतदारांनी मतदान केले आहे. तर एकूण ६५.८३ टक्के मतदान झाले आहे.
कुर्ली एकूण १ हजार २१६ मतदारांपैकी ७०४ मतदारांनी मतदान केले आहे. तर एकूण ५७.८९ टक्के मतदान झाले आहे.
करुळ एकूण १ हजार ५८१ मतदारांपैकी ९९३ मतदारांनी मतदान केले तर एकूण ६२.८१ टक्के मतदान झाले.
नावळे एकूण ७७४ मतदारांपैकी ६१५ मतदारांनी मतदान केले. एकूण ६६.५४ टक्के मतदान झाले.
हेत एकूण ७९९ पैकी ५१० मतदारांनी मतदान केले. तर एकूण ६३.८३ टक्के मतदान झाले आहे.
वैभववाडी तालुक्यातील कोळपे येथे एका बुथवर दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. हा अपवाद वगळता सर्वञ शांतते मतदान पार पडले आहे. आता सर्वांचे लक्ष २० डिसेंबरच्या मतमोजमीकडे लागले असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
फोटो-
१. नावळे येथील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी केलेली गर्दी.छाया संजय शेळके वैभववाडी
