देवगड तालुक्यात ६३.७६% मतदान

⚡देवगड ता.१८-: देवगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी ५.३० वाजेपर्यंत -६३.७६%एवढे मतदान होऊन ३५९५४ मतदारांपैकी -२२९२४ मतदारांनी मतदान केले यात पुरुष मतदार ११९७६ स्त्री मतदार१०९४८ यांनी मतदानाचा हक्क बजाविला.
. पहिल्या दोन तासात स.९.३० वाजेपर्यंत १९% मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.तर ११.३० वाजेपर्यंत ३४.१४ %एवढे मतदान झाले.एकूण मतदार ३५५९४ पैकी १२२७६ मतदारांनी मतदान केले.यात ६७७२ पुरुष व स्त्री मतदार ५५०४ मतदारांनी मतदान केले.दु.१.३० पर्यंत एकूण पुरुष मतदार ९७१६ व स्त्री मतदार ८७४६ एकूण १८४६२ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.तर त्यानंतर दु.३.३० पर्यंत एकूण २०२९८ एवढ्या मतदारांनी मतदान केले यात पुरुष मतदार १०५८१ ,व महिला मतदार ९७१७ यांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी ७.३० वाजलेपासून मतदानास प्रारंभ झाला तालुक्यात एकूण ३५९५४ मतदार असून या पैकी ५५०२ एवढ्या मतदारांनी मतदान केले यात पुरुष मतदार ३७१६ तर महिला मतदात १७८६ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,निवासी नायब तहसीलदार विवेक शेट यांच्या समवेत ६ क्षेत्रीय अधिकारी व अन्य कर्मचारी कार्यरत आहेत.पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारपर्यंत सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

You cannot copy content of this page