सावंतवाडी तालुक्यात ७५ टक्के मतदान

सोनुर्लीत बोगस मतदान रोखले

सावंतवाडी : सावंतवाडीत तालुक्यात 49 ग्रामपंचायतीसाठी 75 %इतके मतदान झाले. बहुतेक ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान पाहायला मिळाले.प्रत्येक गावातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


तर सोनुर्ली मतदान केंद्र क्र.१ वर भोगस मतदानाचा प्रकार रोखण्यात आला. संबधित भोगस मतदाराने आपली चुक कबूल करत आणि कोणाचीच याबाबत तक्रार नसल्याने या विषयावर पडदा टाकण्यात आला.
सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र तीन ग्रामपंचायती थेट बिनविरोध झाल्या तर सात ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले मात्र या ग्रामपंचायती या काही स्थानिक नेत्यांचे गड मानले जात आहेत. हे गड शाबूत राहण्यासाठी प्रत्येक नेत्याने चांगलीच कंबर कसलेली दिसून आली. यात बांदा, नेमळे,मडूरा, माडखोल, चराठा, माजगाव, कारावडे, केसरी, या गावात चुरशीचे मतदान पाहायला मिळाले. प्रत्येक ग्रामपंचायतीचा टक्केवारी आकडा लक्षात घेता एकूण तालुक्यात इतके टक्के मतदान झाले. बाहेरील मतदार आणण्यासाठी प्रत्येकाने नियोजनबद्ध करण्यात येते वापरली बाहेरील मतदारामुळे आकडेवारी यावेळी वाढ दिसून आली.
तालुक्यात दुपारनंतर मतदाराने मतदानासाठी गर्दी केली सातार्डा देऊळवाडी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याने सायंकाळी उशिरा तेथील बाजारपेठ बंद करण्यात आली सावंतवाडी उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दोन तासासाठी हा निर्णय घेत 200 मीटरच्या आतील सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडल्या या प्रकाराने तेथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली कल कितने वर्ष या ठिकाणी निवडणुका झाल्या परंतु असा प्रकार कधीच झाला नाही असे काहींनी सांगितले. तर दुसरीकडे सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक एक येथे दुसऱ्या ग्रहावर ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व सोनुर्ली मध्ये मतदार यादीत नाव असलेल्या एका व्यक्तीने मतदान करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे असलेल्या एका पक्षाच्या पुलिंग एजंटने त्याला मतदानाचा हक्क बजावण्यास रोखून मतदान अधिकाऱ्यांकडे दाद मागितली, एकूणच या प्रकारानंतर वातावरण तंग झाले मतदानाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात हा प्रकार घडल्याने काही वेळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली दरम्यान हरकत घेतलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली. निर्णय अधिकाऱ्यांनीही हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून दोन्हीकडे मतदान करता येत नसल्याचे सांगितले एकूणच घडलेल्या प्रकाराची संबंधित व्यक्तीने माफी मागितल्यानंतर हा प्रकार तडजोडीने मिटवण्यात आला याबाबत तहसीलदार श्री उंडे यांना विचारले असता झालेला प्रकार सत्य आहे परंतु संबंधित व्यक्तीने आपले चूक मान्य केली आणि कोणाचीही तक्रार नसल्याने यावर पडदा टाकण्यात आला एका व्यक्तीला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही शिवाय तो व्यक्ती लोकप्रतिनिधी असल्याने त्याने स्वतः अशी चूक करू नये असे सांगितले.

You cannot copy content of this page