समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत 20 नोव्हेंबरला एक दिवस छोट्यांचा उपक्रम

खाऊ गल्ली सह लहानग्यांसाठी अनेक मनोरंजनाचे उपक्रम

⚡कणकवली ता.०८-: समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने २० नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.कोरोना नंतर हा उपक्रम अजून उत्साहात आयोजित करण्यात आल्याची माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण उपस्थित होते.

समीर नलावडे पुढे म्हणाले, मुंबई येथील गायक सौरभ दफ्तरदार, तृप्ती दामले यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे. कॉमेडी कम अँकर विजय नायर हे देखील या निमित्ताने उपस्थित असणार आहेत. बोलक्या बाहुल्या व जादूगार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणाऱ्या सुचित्रा कुमार यांचे देखील जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील केला जाणार आहे.झोपाळे,पाळणे, घसरगुंडी, मुलांचे खेळ असणारे सर्व प्रकार असणार आहेत.
लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी
समीर नलावडे मित्रमंडळ यांच्याकडून ५० रुपयांचे कूपन दिले जाणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कणकवली शहरातील महिला बचतगटांना प्राधान्य असणार आहे.स्टॉल सर्वांसाठी मोफत ठेवण्यात येणार आहे
सेल्फी पॉईंट, झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. यासाठी ८x१० ची जागा देणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page