भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा आमदार नितेश राणेंना टोला
देवगड ता.०४-:
देवगड जामसंडे नगरपंचायतीची सत्ता येथील युवाशक्तीच्या हाती सोपविल्यानंतर देवगडचे आमदार गेले कित्येक दिवस या भागात फिरकले नव्हते आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा देवगड बद्दल असलेला उद्रेक बाहेर येत होता की देवगड जामसंडे शहराबाबत प्रेम उतू जात होतं हेच समजत नव्हते. गेल्या कित्येक दिवसानंतर येथील स्थानिक आमदार हे धूमकेतू सारखे प्रगटले असून त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन येथील देवगड जामसंडे शहराविषयी प्रेम अथवा राग व्यक्त केला हे कळत नव्हते. देवगड जामसंडे शहर ही पवित्र भूमी स्वर्गीय आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे भूमी आणि भाजपची सत्ता स्थाने होती. पाच वर्षांपूर्वी नगरपंचायत मध्ये सत्ता मिळाल्यानंतर जो कटू अनुभव येथील नागरिकांनी घेतला त्या कटू अनुभवाचा उद्रेक निवडणूक पण निवडणुकीत दिसून आला भाजपच्या कार्यालयावर अंडी फेक झाली तेच भाजपचे नेते मांडीला मांडी लावून बसतात देवगड जामसंडे नगरपंचायतीची सत्ता ही युवाशक्तीच्या हातात गेली असून ही युवाशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने भ्रष्टाचार विरहित कारभार करीत आहे. असा ठाम विश्वास श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी देवगड येथे संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
देवगडचे आमदार यांनी देवगड मधील अवैध धंद्याबाबत पत्रकार परिषद घेऊन जो आक्रमकपणा दाखवला याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया आमदार महोदयांना खरोखरच देवगड शहर स्वच्छ
करायचे असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे सांगून नवीन शासन अस्तित्वात आल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा होत आहे. या जिल्ल्याचा फायदा किती होतो निधी किती मिळतो, याची आपण वाट पाहत असून या जिल्हा विकासासाठी जिल्हा नियोजन मध्ये कोणतेही राजकारण होऊ नये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात नावलौकिक मिळविला असताना सर्वांना समानपणे निधीचे वाटप केले .आमदारांना भरीव निधी दिला होता. त्याच पद्धतीने या जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री न्याय देतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. यापुढे बोलताना श्री रावराणे म्हणाले महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सेना गटाची युतीची सत्ता असून गृहमंत्री भाजपचे देवगड जामसंडे शहरातील अवैध धंद्याबाबत तक्रार देऊनही पोलीस ऐकत नाहीत तर ते दुर्दैव असून बोलण्या पुरते वक्तव्य करायचे आणि नंतर गप्प बसायचे हे यांचे धोरण असून साई सोशल क्लब कोणाचा? ॲम्बुलन्स मधून सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, रायगड पर्यंतचे गोवा बनावटीचीची दारू कोण पोहोचवतात यांना पाठीशी कोण घालते? याचे सर्व पुरावे आपणाकडे असूनसिलिका सॅन्ड भ्रष्टाचार ,रस्त्यांची दुर्दशा रस्त्यांमधील ठेकेदारी हे कोणाची आहे ही येथील जनतेला पूर्ण ज्ञात आहे. रस्त्यांच्या दुरर्दशेला राणे परिवाराची ठेकेदार कंपनीच कारणीभूत असून देवगड
जामसंडे शहर विद्रुप करायचे काम याच कंपनीने केले आहे.भ्रष्टाचार मुक्त कारभार करणाऱ्या युवकांविरुद्ध बोंब करायची ही त्यांची संस्कृती असून या जिल्ह्यात राणे परिवाराची ठेकेदार संस्कृती बळावली असल्याचा आरोपी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून ही ठेकेदार संस्थेची मुळापासून उपटून गरजेचे आहे. यासाठी आपण त्यांच्यासोबत असून पालकमंत्र्यांची ठेकेदारी ते कोणाचे आहेत ते पहाणे आवश्यक आहे. त्याला पाठीशी कोण घालते? घाट रस्त्याची दुर्दशा देवगड जामसंडे मधील रस्त्यांची दुर्दशा हे सर्व ठेकेदार राणे परिवाराचे हितचिंतक असून त्यांचे स्थान डळमळीत झाल्यानेच स्टंटबाजी करून कोणत्याही फायदा होणार नाही .असे सांगून देवगड शहरातील कंटेनर सिनेमागृह चे पैसे अद्यापही भरणा नसून बिलो टेंडर भरून घनकचरा मक्ता घेण्यास याच कंपनीने घेण्यास भाग पाडले त्यामुळे या पुढील काळात देवगड जामसंडे शहर विद्रप करण्याचा मक्ता यांनी घेतला आहे असा आरोपही श्री रावराणे यांनी करून स्वतःचा फायदा झाला नाही तर ते आरडाओरड करतात आणि ज्या ठिकाणी स्वतःचा फायदा असेल त्यावेळी ते गप्प बसतात.ही यांची संस्कृती असून त्यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत असा आरोपही श्री रावराणे यांनी करून सत्ताधारी सर्व नगरसेवक हे देवगड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असून ते सुसंस्कृत असल्याने नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. भ्रष्टाचार अथवा ठेकेदारी करीत नाहीत व एखादा शिवसैनिक यात घातक ठरत असतील तर त्याला वरिष्ठ पातळीवरून निश्चितपणे शासन केले जाईल. परंतु येथील आमदारांचे समर्थक हे भ्रष्टाचारात बुडालेले आहेत असे सांगून देवगड जामसंडे परिसरात अवैध धंद्यामध्ये आपले किती कार्यकर्ते आहेत ते प्रथम त्यांनी तपासून पाहावे. त्याच्या मुळाशी जावे आणि हे अनधिकृत अवैध धंदे जे आमदार महोदय मोर्चा काढून अथवा आक्रमकपणे बंद करणार असतील तर त्यांना निश्चितपणे आमचा पाठिंबा असेल असे सांगून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिरा ताणून बोलणे आणि नंतर करायचेच वेगळे असे असेल तर ते अयोग्य आहे. त्यांनी जरूर मोर्चे काढावेत देवगड जामसांडे शहर अशा मोर्चामुळे अवैध धंद्या मधून स्वच्छ शहर होणार असेल तर निश्चितपणे त्यांच्या सोबत आपण या उपक्रमात सहभागी होऊ असेही त्यांनी शेवटी नमूद केले
यावेळी देवगड जामसांडे नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवक बुवा तारी, तेजस मामघाडी, रोहन खेडेकर,सुधीर तांबे, महिला आघाडी संघटक हर्षा ठाकूर ,गणेश गावकर, संतोष दळवी ,पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
