सेना नेते अतुल रावराणे यांनी केला सन्मान
देवगड ता.०४-:
देवगड तालुका ठाकरे शिवसेना गटाच्या महिला संघटक पदी सौ. हर्षा ठाकूर यांची निवड करण्यात आली या निमित्त त्यांचा विशेष सत्कार श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते देवगड ठाकरे शिवसेना कार्यालयात करण्यात आला.
सौ.हर्षा ठाकूर यांनी या पूर्वी देवगड जामसंडे नगरपंचायत माजी नगरसेविका गटनेत्या तसेच माजी प.स.सदस्य म्हणून मोलाची कामगिरी बजावली असून अभ्यासू व निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष परिचित आहेत.
या सत्कार प्रसंगी नगराध्यक्ष साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,तालुका प्रमुख जयेश नर,देवगड महिला संघटक स्वप्नाली वाल्मिकी ,नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी, निवृत्ती (बुवा )तारी, विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर,सुधीर तांबे,महेंद्र भुजबळ,बाळा कणेरकर गणेश गावकर,संतोष दळवी उपस्थित होते.
