माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरांमध्ये प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात विठ्ठल मंदिर आत्मेश्वर मंदिर दत्त मंदिर भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील अनेक मारुती मंदिर आहेत या प्रत्येक मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करावा असे आवहन माजी नगराध्यक्ष बबन. साळगावकर यांनी केली आहे.
