कुडाळात व्यापाऱ्यावर खुनी हल्ला

पोलीस स्टेशन समोरच घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ

⚡कुडाळ ता.०४-; कुडाळ एम.आय.डि.सी येथील उद्योजक चंदू पटेल यांच्यावर एका कामगाराने गुरूवार रात्री दहाच्या सुमारास कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोरच प्राणघातक हल्ला केला. पटेल यांच्या तोंडावर दगडाने घाव घालत त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आले.

पटेल यांनी तेथेच रहाणार्‍या दोन कामगारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यासंबंधी त्या दोन्ही कामगारांना गुरूवारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. चौकशी व जबाब झाल्यावर पटेल मोटरसायकलवरुन घरी जात असताना त्या कामगारांनी पोलीस स्टेशनच्या गेटवरच मोटरसायकल वरुन पाडून पटेल यांना पकडून दगडाने मारहाण केली. पटेल यांची आरडा ओरड ऐकून पोलिस घटनास्थळी तत्काळ पोहोचत त्यांनी दोन्ही कामगारांना ताब्यात घेत पटेल यांची सुटका केली.

पटेल यांना उपचाराकरिता प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची खबर मिळताच मनसेचे धीरज परब, लालु पटेल, उद्योजक आनंद बांदिवडेकर, संध्या तेरसे व नागरीक पोलीस ठाणे व रुग्णालयाकडे जमा झाले.

You cannot copy content of this page