नितेश राणे आमदार झाल्यापासून मतदारसंघाचा वनवास सुरू झाला

शिवसेना नेते सतीश सावंत : देवगड माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे

⚡देवगड ता.१९-: देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे सर्व लोकांना, विरोधकांना एकत्रित घेऊन जात असताना मंत्रालयात सर्व मंत्री महोदय हे आप्पांना मानणारे असे व्यक्तिमत्व होते. आप्पांची संस्कृती सर्वांना सोबत घेऊन जाणारी होती. विरोधकांना समवेत घेऊन आपल्या भागाचा विकास आदरणीय आप्पासाहेब गोगटे यांनी केला. परंतु या विभागाचे आमदार नितेश राणे हे आमदार झाले पासून खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या मतदार संघाचा वनवास सुरू झाला आहे. त्यांची व्हीजन डॉक्युमेंटरी हे म्हणजे नागरिकांना दाखवि दाखविण्यापूर्ती होती. त्यामुळे २०१४ पासून या प्रभागातील या मतदारसंघातील विकास कामे रेंगाळली असून देवगड जामसंडे नगरपंचायत ही भाजपच्या हातून गेली व शिवसेनेकडे आली आहे. भविष्यात देवगड तालुक्या शिंदे गट व भाजप एकत्रित आले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा या मतदारसंघाबरोबरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फडकणार आहे. असा आत्मविश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला
पडवणे येथील ग्रामपंचायत सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या गटाच्या सरपंच पूर्वा बाजीराव जाधव विराजमान झाल्या त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य देखील पडवणे व मळेगाव ग्रामपंचायत सदस्य विराजमान झाले .या सर्वांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी सतीश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला .देवगड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने विशेष सत्काराचे आयोजन देवगड संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी गणेश गावकर, गणेश वाळके, विभाग प्रमुख रमाकांत राणे संदीप डोळकर बाजी जाधव व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना सतीश सावंत म्हणाले भडवे कुत्रे असे व्यक्तव्य आम नितेश राणे यांच्याकडून करण्यात आले .याचा जाहीर निषेध करत असून स्वतः जाहीर टीका टिपणी करायची आणि दुसऱ्या टिपणी केली ती सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्याचे सोडून द्यावे. भडवे कुत्रे असे वक्तव्य करून आमदार नितेश राणे यांचा स्वतःचा जनाधार आणि भाजपचाही जनाधार कमी होत आहे. मशाल या निशाणीबद्दल वक्तव्य करत असताना आईस्क्रीमचा कोन असे वक्तव्य करण्यात आले परंतु आईस्क्रीमचा कोन सरळ धरला तर तोंड भाजेल आणि उलटा धरला हात भाजेल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम काय होतील व येथील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या स्वाभिमान पक्षाची निशाणी अथवा स्वाभिमान पक्ष एक वर्ष टिकवू शकले नाहीत. त्यांनी दुसऱ्याच्या पक्षावर अथवा निशाणीवर टीका करणे वेळीच थांबवावे वैभव नाईक यांची मालमत्ता बेनामी आहे. असे राणे कुटुंबे सांगत असताना यांनी कुटुंबियांची मालमत्ता किती बेनामी आहे हे येथील जनतेने ज्ञात आहे उलट नितेश राणे यांनी कितीही ओरडून जनतेला सांगितले तरी त्यांच्या त्या वक्तव्यामुळे आमदार वैभव नाईकच मोठे होतील. त्याचबरोबर भास्कर जाधव यांच्यावर टीका टिपणी करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला तर शिवसेना कदापि गप्प बसणार नाही

You cannot copy content of this page