डाक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

जिल्हा डाक अधीक्षक मयुरेश कोले यांची माहिती

ओरोस ता.१९-:

सिंधुदुर्ग जिल्हा डाक विभागाकडून राष्ट्रीय डाक सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त वित्तीय सशक्तीकरण उपक्रम तसेच नवीन १० हजार अल्प बचत खाती उघडण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धा शाळा स्तरावर घेण्यात आली. स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती जिल्ह्याचे डाक अधीक्षक मयुरेश कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी कोले यांनी मंगळवारी आपल्या दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी विकास अधिकारी बालाजी मुंडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page