गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी सहकार्य करणार

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी;गोकुळ आणि जिल्हा बँक संचालक बैठकीत निर्णय

ओरोस ता.१९-:

जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता एक लाख लिटर पर्यंत वाढविण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करेल. जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच अनुभवी डॉक्टर दिले जातील. चारा निर्मिती व प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. दुग्ध व्यवसायिकाना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिध्द असलेला “आनंद” पॅटर्न राबविला जाईल, अशी हमी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष व संचालक, अधिकारी यांनी आज जिल्हा बँकेला दिली असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील दूध उत्पादन पुढील चार वर्षात एक लाख लिटर करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघ यांच्या अध्यक्ष व संचालक यांची संयुक्त बैठक सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आ नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोकुळ दूध संघ अध्यक्ष विश्वासराव पाटील, माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, अजित नरके, विजयसिंह मोरे, नंदकुमार ढेगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस आर पाटील, बयाजी शेळके, अंजनीताई रेडकर, योगेश गोडबोले, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, व्हिक्टर डांटस, विद्याप्रसाद बांदेकर, संदीप सावंत, प्रज्ञा ढवण, प्रकाश मोर्ये, गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह अन्य संचालक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक संघांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page