नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना
⚡कणकवली ता.१९-: कणकवली नगरपंचायतच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कणकवलीत भरवण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे.
मातीच्या वस्तू, बांबू पासून बनवलेले आकाश कंदील, माती पासून बनवलेले आकर्षक आकाश कंदील यासह बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या फराळाच्या वस्तू व अन्य अनेक वस्तूंचा या दिवाळी बाजारात समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, नगरसेवक विराज भोसले, अभिजित मुसळे, मेघा गांगण, रवींद्र गायकवाड, शिशिर परुळेकर, मेघा सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, प्रतीक्षा सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक उर्वी जाधव, बंडू गांगण, किशोर राणे, सुशील पारकर, प्रज्वल वर्दम, राजन परब, गौतम खुडकर, मनोज धुमाळे, अमोल भोगले, आनंद पारकर, पंकज पेडणेकर, बाळा सावंत, महेश सावंत आदी उपस्थित होते.
