⚡बांदा ता.१९-: ग्रामपंचायत कार्यालय शेर्लेमधून १५ वा वित्त आयोग अंतर्गत उपकेंद्र शेर्ले यांना गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी उपयुक्त पडतील अशी औषधे वाटप करण्यात आली.
यावेळी सरपंच उदय धुरी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पटवर्धन, आरोग्य सहाय्यक गवस तसेच ग्रामसेवक राजन नाईक, वराडकर मॅडम, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
