कणकवलीत भाजपच्या १७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

⚡कणकवली ता.१७-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा कणकवलीत पटवर्धन चौक येथे आज बुधवारी दुपारी प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षांसह तब्बल 17 जणांवर कणकवली पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम 285,336,143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, मेघा गांगण, प्राची कर्पे, निखिल आचरेकर, गणेश तळगावकर, स्वप्नील चिंदरकर, सचिन पारधिये, संदीप सावंत, आनंद घाडीगावकर, विजय चिंदरकर, समीर प्रभूगावकर, नितीन पाडावे, नयन दळवी, सर्वेश दळवी, पप्पू पुजारे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page