⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला ते पंढरपूरला दरवर्षी निघणारी कार्तिकी पायी वारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून निघून प्रत्येक मुक्कामास भेट देत ६ नोव्हेंबर रोजी पंढपूरला पोहचणार आहे.
दि.२६ रोजी दुपारी बिपिन वरसकर यांच्या घरी, रात्री सुरेश नाईक-मठ यांच्या घरी, २७ रोजी सकाळी कै.चंदुशेठ आसोलकर बाग कामळेवीर, रात्री बबन नाईक, कोलगाव यांच्या घरी, २८ रोजी सकाळी साटम महाराज आश्रम, रात्री आंबोली, २९ रोजी दुपारी आजरा व रात्री निपाणी, ३० रोजी दुपारी नरसिहवाडी, रात्री मिरज, ३१ रोजी दुपारी नागज, रात्री सांगोला, १ नोव्हेंबर रोजी दुपारी मठ वस्ती व रात्री पंढरपूर, २ ते ५ नोव्हेंबर पंढरपूरला मुक्काम, ६ नोव्हेंबरला वारकरी आपापल्या घरी पोहचतील. या वारीत सहभागी होऊ इच्छिणा-यांनी आपली नावे सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर गुरुकुल आश्रम येथे द्यावीत असे आवाहन श्री सद्गुरु चांदेरकर महाराज शिष्यगण कमिटीने केले आहे.
