⚡वेंगुर्ला ता.२०-: दीपावली सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला-बाजारपेठ (गाडीअड्डा नाका) येथे दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे.
दि.२७ रोजी सायंकाळी ७ वाजता रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स, दि. २८ रोजी सायंकाळी ७ वाजता व्हरायटी शो आणि दि.२९ रोजी महिलांसाठी विशेष खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे केले आहे.
