विशाल परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त ; उपस्थित राहण्याचा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांचे आवाहन
⚡बांदा ता.१३-: भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा सरपंच अक्रम खान,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या सौजन्याने आज (ता.१३)रात्रौ ७ वाजता जंगी डबल बारी २०/२०भजन सामन्याचे आयोजन कट्टा कॉर्नर ओवेस कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन बांदा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांनी केलं आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध बुवा संदीप लोके(वडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ) आणि बुवा विजय उर्फ गुंडू सावंत(हनुमान प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ) यांच्यात हा जंगी सामना होणार आहे.
बुवा संदीप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत तर तबला साथ संदेश सुतार करणार आहेत.बुवा विजय सावंत याना पखवाज साथ विराज बावकर तर तबला साथ शुभम सुतार करणार आहेत.
