माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी वेधले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष
⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांनी विविध कामांसाठी एकूण 109 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
