आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०७-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा संपन्न झाली.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षक प्रविण सुलोखार यांनी प्राथमिक उपचारबाबत मार्गदर्शन केले. तसेच आपल्याकडील साधनाद्वारे एखाद्या व्यक्तीवर आलेली आपत्ती आपण कशाप्रकारे प्रथमोपवार देऊन हाताळु शकतो याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांच्यासह वकिल, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.
You cannot copy content of this page