Headlines

नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त वैभववाडीत १५ ऑक्टोबरला काव्यवाचन कार्यक्रम…

⚡वैभववाडी ता.०६-: मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी, कामगारांचे जीवन, कष्टकऱ्यांच्या वेदना आणि सामान्य माणसाच्या संघर्षाला आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडणारे वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र,कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण या साहित्यिक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन महाविद्यालय स्थानिक समिती चे सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.


​मराठी काव्यपरंपरेतील नारायण सुर्वे यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, विद्यार्थ्यांमध्ये काव्यवाचनाची आवड निर्माण व्हावी आणि साहित्याविषयी अभिरुची विकसित व्हावी, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
​कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्ताने गुरुवार, दिनांक 15 ऑक्टोबर 2026 सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 यावेळेत आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी.येथे काव्य वाचनाचा कार्यक्रम होत असून प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने साहित्यिक उपक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. तसेच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन प्रमोद रावराणे यांनी केले आहे

You cannot copy content of this page