आमदार दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत..
⚡सावंतवाडी, ता. ६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, आज रात्री त्यांचा मुक्काम सावंतवाडी येथे आहे. काही वेळापूर्वी त्यांचे मोपा विमानतळावर आगमन झाले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते तथा आमदार दीपक केसरकर यांनी मोपा विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन मंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या जिल्हा दौऱ्यात मंत्री दादा भुसे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, त्यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

