Headlines

महेश संसारे यांची भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड…

⚡​वैभववाडी ता.०६-: महाराष्ट्र शासनाचा ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. महेश संसारे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
​किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या हस्ते श्री. महेश संसारे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
​या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेशजी सावंत, संघटक श्री. प्रसन्नजी देसाई, प्रदेश सदस्य श्री. मोहनजी सावंत, माजी अध्यक्ष श्री. अमृतजी चौगुले, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे सदस्य श्री. दीपकजी भगत यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
​या फेरनिवडीबद्दल आभार मानताना श्री. महेश संसारे यांनी शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. त्यांच्या या फेरनिवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय व कृषी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page