Headlines

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्ग,दि.०६-: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ०९.०५ वाजता सावंतवाडी येथे आगमन. नंतर सावंतवाडी येथून शासकीय विश्रामगृह कुडाळकडे प्रयाण व मुक्काम.
बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८ ते १२ वाजता शाळा भेटीचा कार्यक्रम. दुपारी १ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी आढावा बैठक. सायंकाळी ६.०० वाजता सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीकडे प्रयाण.
००००००

You cannot copy content of this page