14 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा..

⚡सिंधुदुर्गनगरी,दि.०६-: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना 11 महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एकूण 132 कुशल व अर्धकुशल कार्य प्रशिक्षणार्थी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या रोजगाराभिमुख संधीचा लाभ घेण्यासाठी 14 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रशिक्षण संधीमध्ये उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) 112, उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम) 5, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम क्लार्क 8 आणि बहुउद्देशीय कर्मचारी 7, अशा एकूण 132 जागांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकानिहाय पदांची संख्या निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये उपशिक्षक मराठी, उपशिक्षक उर्दू, डाटा ऑपरेटर आणि बहुउद्देशीय कर्मचारी या पदांचा समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार देवगड तालुक्यात उपशिक्षक मराठी १९, उपशिक्षक उर्दू १आणि बहुउद्देशीय कर्मचारी १, अशी एकूण २१ पदे आहेत. दोडामार्ग तालुक्यात उपशिक्षक मराठी ९, डाटा ऑपरेटर १ आणि बहुउद्देशीय कर्मचारी १, अशी एकूण ११ पदे आहेत. वेंगुर्ला तालुक्यात उपशिक्षक मराठी १५ अशी एकूण १५ पदे आहेत. सावंतवाडी तालुक्यात उपशिक्षक मराठी १३ आणि उपशिक्षक उर्दू १ अशी एकूण १४ पदे आहेत. मालवण तालुक्यात उपशिक्षक मराठी १८, उपशिक्षक उर्दू १ आणि बहुउद्देशीय कर्मचारी १ अशी एकूण २० पदे आहेत. कुडाळ तालुक्यात उपशिक्षक मराठी १५ आणि उपशिक्षक उर्दू १, अशी एकूण १६ पदे आहेत.कणकवली तालुक्यात उपशिक्षक मराठी १५, डाटा ऑपरेटर १ आणि बहुउद्देशीय कर्मचारी १, अशी एकूण १७ पदे आहेत. वैभववाडी तालुक्यात उपशिक्षक मराठी ८, उपशिक्षक उर्दू १, डाटा ऑपरेटर १ आणि बहुउद्देशीय कर्मचारी १, अशी एकूण ११ पदे आहेत.
जिल्हा मुख्यालयासाठी डाटा ऑपरेटर ५ आणि बहुउद्देशीय कर्मचारी २, अशी एकूण ७ पदे आहेत. जिल्ह्यात एकूण ११२ उपशिक्षक मराठी, ५ उपशिक्षक उर्दू, ८ डाटा ऑपरेटर आणि ७ बहुउद्देशीय कर्मचारी अशी एकूण १३२ पदे आहेत.
उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी 12 वी, डी.एड. पदविका/पदवी तसेच बी. एड. पदवी मराठी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उर्दू माध्यमातील पदासाठी 12 वी, डी. एड. पदविका/पदवी तसेच बी. एड. पदवी उर्दू माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर कम क्लार्क पदासाठी 12 वी अथवा पदवी उत्तीर्ण, एम. एस. सीआयटी किंवा तत्सम प्रमाणपत्र तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बहुउद्देशीय कर्मचारी पदासाठी 12 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र युवक-युवतींनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून उपलब्ध प्रशिक्षण संधीसाठी अर्ज दिनांक 14 ऑक्टोंबर 2026 पर्यंत करावा.
जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी शासकीय आस्थापनेत कार्यानुभव मिळवून रोजगार क्षमतेला चालना देणाऱ्या या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य समिती सभापती यांनी केले आहे.
0000000
