शहरातील मटका, जुगार धंदे बंद करा ;

पालकमंत्र्यांकडे संजू परब यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.०७- : शहरात जोरदार सुरू असणारे अवैध मटका व जुगार धंदे बंद करण्याचे आदेश पोलीसांना द्यावेत अशी मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. शहरात वाढते अवैध जुगार अन् मटका धंदा पाहता टपरी धारकांवर कारवाई न करता या संबंधीत कंपन्या मालकांवर थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजू परब यांनी केली. तर या संदर्भात सावंतवाडीतील नागरिकांना घेऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली.

You cannot copy content of this page