⚡मालवण ता.१८-: गेल्या दोन दिवसांपासून कालावली खाडीपट्ट्यात परप्रांतीय कामगार बेपत्ता झाल्याची सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी
मालवण तालुक्यातील शेलटी येथील खाडी पात्रात अजयकुमार विश्वनाथ सिंह (रा. झारखंड) या परप्रांतीय कामगारांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे हा परप्रांतीय कामगार हा वाळू कामगार असल्याची जोरदार चर्चा सद्या कालावल खाडी पट्ट्यात सुरू आहे
दरम्यान, याबाबत मयत अजयकुमार सिंह याचे नातेवाईक दशरथ सिंह यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
शेलटी खाडीपात्रात आज दुपारी मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे, पोलीस श्री. पेडणेकर आदी उपस्थित होते. यानंतर या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले.
हा मृतदेह चिंदर तेरई येथे काम करणाऱ्या अजयकुमार सिंह याचा असल्याची खबर त्याच्या नातेवाईकांनी मालवण पोलीसात दिली आहे. अजयकुमार हा दि. १६ सप्टेंबर पासून बेपत्ता होता. मात्र आज त्याचा मृतदेह शेलटी खाडी पात्रात सापडून आला. याबाबतचा तपास मालवण पोलिसांकडून आचरा पोलीस स्थानाकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
