एक मच्छीमार बेपत्ता तर दोघांना वाचविण्यात यश
⚡मालवण ता.१९-: देवबागच्या समुद्रात मच्छिमारी करून किनाऱ्यावर परतणाऱ्या एका मच्छिमारी नौकेला समुद्राच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने नौका उलटून झालेल्या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णु बळीराम राऊळ हे पंचावन्न वर्षीय मच्छिमार बेपत्ता झाले असून गौरव राऊळ आणि गंगेश राऊळ या दोघाजणांना वाचविण्यात यश आले आहे आज सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्घटना देवबाग संगम येथे घडली याबाबत ची माहिती पोलीस पाटील येरागी यांनी दिली आहे
