बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी पी.के. चौकेकर

तर महासचिवपदी आनंद धामापूरकर

⚡मालवण ता.१८-: बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड. संदीप ताजने यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी.के. चौकेकर यांची जिल्हाध्यक्षपदी तर जिल्हा महासचिव पदी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, बौद्ध धम्माचे श्रामणेर प्रशिक्षण घेतलेले असे आनंद धामापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली .

बसपाचे जेष्ठ कार्यकर्ते रवींद्र कसालकर व सुधाकर माणगावकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब खेमनगिरे ,जिल्हा सचिव सुहास हिंदळेकर तर कोषाध्यक्ष म्हणून नरेंद्र पेंडुरकर यांची नियुक्ती करण्यात आली .
पी. के. चौकेकर हे १९९३ पासून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत.
चौकेकर यांनी याआधी बसपाचे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश सचिव, नाशिक झोन प्रभारी, जिल्हा प्रभारी या पदांची जबाबदारी सांभाळली आहे .आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने विश्वासाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री चौकेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page