आंबोली,ता.१८: येथील शेतकरी आणि ग्रामस्थ वनविभागाविरोधात सोमवारी उद्या सकाळी १० वाजता वनक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. आंबोली येथील वनविभागाचे कारनामे वाढत आहेत.त्या ठिकाणी हत्तींचा कोणताही अधिवास नाही आणि तसा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे त्याला ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे.या ठिकाणी एक तस्कर हैदोस घालत असून त्याला त्यांच्या मूळ जग्यात मूळ ठिकाणी नेवून सोडावे.व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. कबुलायतदार गावकर जमिनी वर महाराष्ट्र शासन लागल्याने येथील वण्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान भरपाई मिळत नाही.त्या ऐवजी प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा या द्वारे नुकसान भरपाई मिळावी.सौर कुंपण घालण्यात यावे.वनविभागाकडून येथील जमिनी खोदलेले चर आहेत ते बुजले आहेत ते पुन्हा खोदण्यात यावे. या मागण्यांसाठी आंबोली नांगरतासवाडी तसेच गावातील ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करणार आहेत असे निवेदन वनविभागाला देण्यात आले आहेत.यावेळी सरपंच सावित्री पालेकर तसेच शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे तसेच अनेक ग्रामस्थांच्या त्यावर सह्या आहेत.सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी मिळण्यासाठी आंबोलीत ग्रामस्थांचे उद्या ठिय्या आंदोलन…
